कामजीवनातील सत्य भाग ६

सदर मालिकेत मला, तुम्हा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही सुद्धा तुमचे प्रश्न मला इमेल आयडी वर विचारू शकता, मी नक्कीच त्यांची उत्तरे द्यायचा प्रयत्न करेन.

शीघ्रपतन म्हणजे नक्की काय?

संभोगादरम्यान वेळेआधीच लिंगातून वीर्य बाहेर येणे म्हणजे शीघ्रपतन. असं म्हणतात की साधारणतः संभोग 3-5 मिनिटे चालतो. अर्थात प्रत्येकासाठी हा काळ कमी जास्त असू शकतो. मात्र अपेक्षेपेक्षा कमी वेळात वीर्य बाहेर येत असेल तर दोन्ही जोडीदारांची निराशा होऊ शकते. शीघ्रपतन कोणत्याही वयात होऊ शकते आणि ही लैंगिक समस्यांमधली सर्वात जास्त आढळणारी समस्या आहे.

शीघ्रपतन का होतं?

तरूणपणी जेव्हा लैंगिक संबंधांचा अनुभव नसतो तेव्हा आपल्याला ‘सगळं’ जमेल ना या चिंतेमुळे शीघ्रपतन होऊ शकतं. काही काळाने यावर ताबा येतो. यासोबत इतरही कारणांमुळे ही समस्या निर्माण होते. सेक्सविषयी भीती किंवा अति आतुरता, कामाचा किंवा इतर प्रकारचा ताण, लैंगिक संबंधाचा आधीचा अनुभव फारसा आनंददायी नसेल तर त्यामुळेही शीघ्रपतन होऊ शकतं. काही वेळा काही शारीरिक आजारही कारणीभूत ठरतात. कधी कधी तर जोडीदाराविषयी आकर्षण आणि प्रेम नसेल तरी शीघ्रपतन होऊ शकतं.

यावर उपाय काय?

सेक्सची सवय झाली की हळू हळू यावर ताबा येतो. रिलॅक्सेशन पद्धतींचा उपयोग होऊ शकतो. सेक्स आणि संभोगाबद्दलची चिंता, दडपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा उपयोग होईल. तसंच ऑरगॅझम कधी येतो, त्याआधी शरीरात, मनात काय संवेदना निर्माण होतात याचं निरीक्षण करा. त्या क्षणी समागमाचा वेग थोडा मंदावण्याचा प्रयत्न केला तर लवकर वीर्य बाहेर येणार नाही. यासाठी जोडीदाराचं सहकार्य आवश्यक आहे आणि मुख्य म्हणजे एकमेकांशी संवादही तितकाच महत्त्वाचा आहे.

वैद्यकीय मदत, सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला आणि काही वेळा औषधांचा उपयोग होऊ शकतो. न घाबरता आणि न लाजता आपली समस्या डॉक्टरांना सांगा. दोन्ही जोडीदारांनी दोषारोप न करता एकमेकांना समजून घेतलं, सेक्स सोडून एरवीही जवळीक वाढवली, धीर दिला तर त्याचा परिणाम निश्चित चांगला होऊ शकेल.

This content appeared first on new sex story .com

यामुळे कमजोरी येते का?

नाही, ही एक नसर्गिक गोष्ट असल्या मुळे ह्यामुळे कमजोरी येत नाही. पण खूप कमी वेळात जर तुमचं पतन होत असेल तर नक्कीच तुम्हाला कमजोरी येऊ शकते. लहान पणी केलेल्या काही चुकांन मुळे सुद्धा शीघ्रपतन होते.

ह्यामुळे गरोदर पणवर काही परिणाम?

नाही, शीघ्रपतन आणि शुक्राणूंची संख्या किंवा ताकद यांचा काही संबंध नाही. तुमची जोडीदार गरोदर होऊ शकते जरी तुम्हाला शीघ्रपतनचा त्रास असेल तरी.

Viagra घेऊन शीघ्रपतन कमी किंवा थांबवले जाऊ शकते का?

नाही..! Viagra हे औषध ज्यांना शिस्न मधे कडक पणा येत नाही त्या लोकांसाठी आहे, चुकून पण याचा गैरवापर करू नका..!

लेख आवडला तर कृपया आपला अभिप्राय नक्की मला पाठवा…! Email ID – [email protected]

तुमचे प्रश्न कमी असल्या मुळे ही मालिका प्रकाशित करायला उशीर होत आहे. मला जास्तीत जास्त प्रश्न विचारून आपल्या लैंगिक समस्यांचे निवारण करा आणि ही मालिका चालू ठेवण्यास प्रोत्साहन द्या..!

This story कामजीवनातील सत्य भाग ६ appeared first on dead

Free Sex Chat

You cannot copy content of this page