बाळाला जन्म देताना आईचा दुसरा जन्म असतो. कारण मातेच्या शरीरात गर्भ राहिल्यापासून ते प्रसूती झाल्यानंतर शरीर मूळ अवस्थेत यायला बराच कालावधी लागतो.*मातेचं शरीर पुनरावस्थेत यायला किती कालावधी लागतो?*खरंतर हा कालावधी अचूक सांगता येणार नाही कारण प्रत्येकीच्या शरीरानुसार हा कालावधी पूर्णतः वेगळा असू शकतो. कोणाला दोन-तीन महिने, कोणाला सहा महिने तर कोणाला 1 वर्षाहून जास्त लागू शकतो. तसेच बालक जोपर्यंत स्तनपान करत असते तोवर तिचे हार्मोन्सची पातळी पूर्णतः मूळ अवस्थेत यायला वेळ लागतो.*नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन झाल्यानंतर संभोग कधी करावा?*डिलिव्हरी कोणत्याही प्रकारे झालेली असली तरी साधारण सहा ते आठ आठवड्याच्या पुढे सेक्स करावा. संभोंग करण्याची इच्छा व्यक्ती परत्वे हा कालावधी वेगळा असू शकतो.
दोन्ही जोडीदाराची संमती गरजेची असते. ज्या महिलांना योनीच्या बाजूला टाके आहेत,किंवा कोणतेही इन्फेकॅशन झालं असेल तर त्यांनी डॉ च्या सल्याने औषधोपचार करून पूर्ण बरं झाल्यानंतर मगच संभोग करावा.*पुनरावस्थेत आणण्यासाठी जोडीदार म्हणून महत्वाची भूमिका काय असायला हवी* या अवस्थेत स्त्री शारीरिक दृष्ट्या जेवढी कमजोर असते तितकीच मानसिकदृष्ट्या. जास्त करून पहिल्यांदा जर माता बनली असेल तर ती स्त्री मानसिकदृष्ट्या असंख्य विचारातून जात असते.जसे की आई म्हणून तिच्या जबाबदाऱ्या, बाळाची कपडे बदलणे, शी- सु,वेळोवेळी स्तनपान करणे, डिलिव्हरी नंतर आलेला थकवा ,प्रॉपर झोप न होणे ,काहीवेळा प्रसूतीनंतर चे डिप्रेशन आणि विशेष म्हणजे बाळाच्या घड्याळाला तिची वेळ match करण्याचा सततचा तिचा प्रयत्न असतो.
खूप बदल होत असतात .त्याचाच परिणाम हार्मोन्स imbalance ,आधीच हार्मोन्स(oestrogen) लेव्हल ड्रॉप झालेली असते अश्या अनेक कारणाने तिच्यातील सेक्स ड्राईव्ह कमी होतो. जो पर्यंत ती संभोगास तयार होत नाही तोवर तिच्यातील आणि जोडीदारामधील नातं घट्ट होण्यासाठी, तिची छोट्या छोट्या गोष्टींची काळजी एक जोडीदार म्हणून घेणे गरजेचे असते तिच्या दृष्टीने. तिची झोप कशी होईल,तिची जेवणाची वेळ किंवा बाळाला झोपवण्यासाठी जोडीदाराने वेळ देणे,तिचा हात पकडून तिला मानसिक आधार देणे, कधी पाठीला कंबरेला पायाला मालिश करणे.अश्या अनेक छोट्या गोष्टींनी नात्यातला बंध घट्ट तर होतोच पण एक प्रकारे तिचा sexual drive सुधारण्यास चांगली मदत होते.प्रसूतीपूर्व जितका त्याहून प्रसूतीनंतर जास्त फोरप्ले करणे अपेक्षित असते.