संभोगाच्या नाना तऱ्हा परि ही असे एक !

 

हा रांगड्या भाषेतला हा लेख !आपली तयारी असल्यास वाचा दोन गोष्टी शिकवणारा सुद्धा आहे! स्त्रीला जवळ घेतल्या घेतल्या चवथ्या –पाचव्या मिनिटांला ज्यांना संभोग करुन मोकळे व्हायचे असते, त्यांची गणना ताटावर बसल्या बसल्या ढेकर देणारांत करावी लागेल. चवीने चावत चावत जेवणे आणि चवीने खेळत खेळत खुलवत खुलवत रोमांचित करत संभोग करणे, हे ज्याला कळते, तोच खरा जगण्याच्या लायकीचा. ज्याला हे कळत नाही त्या पुरुषाला ना पुरुष कळला, ना स्त्री कळली, ना कळला शरीरधर्म. आवडीच्या पदार्थांनी भरलेल्या ताटाकडे जसे आपण पाहतो तसे स्त्री-पुरषांना एकमेकांकडे पाहता आले पाहिजे. काय तोंडी लावायचे, काय चोखायचे आणि काय चोळायचे हे माहिती नसेल तर त्याला शुद्ध मराठीत अडाणचोटपणा म्हणतात. एकमेकांविषयीच्या अनिवार ओढीतून एकांतभेट होणार असेल तर भेटणे निश्चित झाल्याच्या क्षणापासूनच संभोगाची खरी क्रिया सुरु होते. तिचे स्तन, तिचा खालचा वरचा ओठ, एरवी दृष्टीस न पडणारा तिचा एखादा तीळ, तिचा डौलदार पार्श्वभाग, तिच्या योनीभोवती पहारा देणारे मुलायम केस, तिच्या काखांचा सुगंध,

तिच्या योनीपटलाचा स्पर्श आणि तिच्या अस्तित्वाचा, प्रणयाचा गंध याच्या पूर्वस्मृती जाग्या होऊन त्या पुरुषाचा ताबा घेतात. तर स्त्रीला त्याच्या मिठीची घट्ट पकड आठवते. तिच्या घशापर्यंत जाणारी त्याची जीभ आठवते. तिच्या पार्श्वभागाला घट्ट धरुन आवळणारे त्याचे हात आठवतात. तिच्या मदनमन्यावर अलगद खेळणारी त्याची जीभ आठवते. तिच्या योनीच्या ओलेपणाचा अंदाज घेणारी त्याची उत्सुक बोटे आठवतात आणि तिला सुखाच्या सागरातून पोहत पोहत पैलतीरी घेऊन जाणारे त्याचे लिंग आठवते. या सर्व गोष्टी जर आपल्या जोडीदाराला आपण जवळ येणार आहे़ या अनुभुतीने जेव्हा घायाळ करतात तोच सखा सखी भूतलावर सहजीवनाचे स्वर्ग सुख अनुभवत असतात बाकीविषयी न बोललेले बरे. या शिवाय प्रत्येक जोडीदाराला त्याचे-तिचे नाक, कान, गळा, बेंबी, दाढी, मिशी, हनुवटी, बोटे, पोट असे काहीही *‘स्पेशल’* आठवू शकते. या स्पेशलचा शोध लागण्याची ज्याची त्याची प्रक्रिया आणि कारणे वेगळी वेगळी असतात.

पण ज्याला जिला एकमेकांची ही सुखासीन स्थळ माहीत असतात ते पारंगत व परमसुखी जोडपी समजावी. ‘बॉल दाबणे’ असा एक शब्दप्रयोग आपण अनेकदा ऐकतो. खरं तर एवढा अरसिक शब्दप्रयोग दुसरा कुठला नसेल. ते केवळ दाबण्यातून ना तिला आनंद मिळतो, ना त्याला सुख. स्तन दाबायचे नसतात, तर कुरवाळायचे असतात. आकर्षक स्तन हे पुरुषाला स्त्रीकडे खेचून घेणारे एक जालीम अस्त्र आहे. परंतु प्रत्यक्ष सभोग क्रियेत स्तन पुरुषापेक्षा स्त्रीला अधिक सुख देतात. स्तन प्रेमानं कुरवाळले गेले की त्या आनंदाची लहर थेट योनीपर्यंत पोहोचते. स्तनांभोवती जीभेच्या टोकानं ओलावा पेरला की स्तनाग्रे ताठरतात. ती ताठरलेली स्तनाग्रे दातांच्या चिमटीत हळुवार पकडून त्यांना न दुखावता चावा घेणे ही एक कला आहे. ज्याला ती जमली त्याची स्त्री, त्याची सखी, त्याची शैया सोबतीण खरी भाग्यवान म्हटली पाहिजे. संभोगाचा खरा मार्ग मुखमैथुनातून जातो परंतु या मार्गावर अडचणी खूप असतात. लज्जा, भय, किळसवाणेपणाची भावना या तीन खंद्या शत्रुंना पराभूत करण्याची इच्छा, कुवत आणि बळ स्त्रीकडे असले तरच या मार्गाने जाता येते. पुढे मग ती हळूहळू मुखमैथून हे केवळ सुख देणे नसून अपार सुख घेणेही आहे, हे स्त्रीला आपोआप कळते.

You cannot copy content of this page