एका वेगळ्याच घरात मी लग्न करून आले – भाग ४



दुसरा दिवस उजाडला. मी काकीची वाट पाहत होती. खूप वेळ झाला पण काकी काही खाली आली नाही. शेवटी मी वर काकीला पाहायला गेली. तर काकी कामात होती. मी विचार केला नंतर बोलते मग.

घरात हलचल खूप होती म्हणून काकीशी बोलता आले नाही. आता जवळ दोन दिवस होऊन गेले. रविवार आला. मी सकाळी लवकर उठली होती. आज घरी जास्त मंडळी नव्हती.

काका, सासू आणि सासरे एका नातेवाईक कडे गेले होते. ते संध्याकाळी येणार होते. लहान भाऊ मित्रांबरोबर फिरायला गेला होता. मोलकरीण तिच्या घरी गेली होती, ती उदय येणार होती. घरी आता आचारी, काकी आणि तिचा ५ वर्षाचा मुलगा, डिवोर्स झालेली मोठी बहीण आणि माझा नवरा आणि मी.

आम्ही नास्ता केला आणि काकी म्हणाली मी बाजारात जातेय. मला पण काही वस्तू बाजारातून घायच्या होत्या तर मी काकी ला म्हणाली मी पण येते. मी लगेच खोलीत जाऊन तयार झाली. नवऱ्याला पण सांगितले मी बाजारात जातेय. ४ वाजताच्या गाडीने परत येऊ.

You cannot copy content of this page