क्षणार्ध

मोबाईलचा अलार्म वाजताच तो धडपडत उठला. डोळे चोळत बाथरूम मध्ये शिरला आणि चेहऱ्यावर पाण्याचे सपकारे मारून थोडा फ्रेश झाला. धावतच बाहेर येत त्याने आपल्या टेबलावरची सगळी वह्या पुस्तकं भरभर उचलून बेडवर भिरकावली. टेबल रिकामा करून फतकल मांडून टेबलवर बसला आणि खिडकी उघडली आणि मोबाईलचा कॅमेरा चालू कडून रस्त्याकडे लावून वाट पाहू लागला. दोन तीन मिनिटांनी काही फोटो काढून तो पुन्हा खाली उतरला. हसत ते फोटो पाहत तो मोबाईलच्या स्क्रीनवरून हळुवारपणे आपली बोटं फिरवत होता.
दोन महिन्याभरांपूर्वीच समोरच्या नव्या बिल्डिंगमध्ये डॉ गिरीश कामात यांचं क्लिनिक सुरु झालं होतं. ते शहरातले प्रसिद्ध सर्जन होते. बिल्डिंगमध्येच फर्स्ट फ्लोरलाच अगदी त्याच्या क्लिनिकच्या वरच त्यांनी राहण्यासाठी फ्लॅटही घेतला होता. त्यांच्या पत्नी डॉ शर्वणी कामत यांचीही दातांची प्रॅक्टिस त्यांच्या क्लिनिकमध्ये चालू झाली होती. काही दिवसांपूर्वी सकाळी सकाळी क्रिकेट खेळून कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसलेला असताना त्याला डॉक्टरीनबाई मॉर्निंगवॉक वरून परतत असताना दिसल्या. मित्रांकडून त्याने त्यांच्याबद्दलची बरीच माहिती मिळवली. त्या दिवशीपासून त्याचं क्रिकेट बंद झालं. सकाळी नेमकं मॅडम मॉर्निंगवॉकवरून परतण्याच्या वेळी तो आपल्या खोलीच्या खिडकीत बसून त्यांचे फोटो काढु लागला. मनातल्या मनात कितीतरीवेळा त्याने त्यांना मिठीत घेऊन त्यांच्या आखीव टपोऱ्या ओठांची असंख्य चुंबनं घेतली होती. तो एकटा एकटा राहू लागला. सारखा मोबाईलमध्ये काहीतरी चाळे करत बसू लागला. रात्रंदिवस फक्त शर्वणी शर्वणी आणि शर्वणीच त्याच्या डोक्यात घुमू लागलं होतं.
डॉक्टरीणबाई दिसायला खरंच लाखांत एक होत्या . देवाने त्यांच्यावर सौंदर्याची अक्षरशः उधळण केली होती आणि आपले सौंदर्य अजून कसं खुलवायचं हे त्यांना चांगलं ठाऊक होतं. त्यांची त्वचा कमालीची गोरी होती. आपल्या केसांना त्यांनी हलका भुरकट रंग दिला होता त्यामुळे त्या अगदी परदेशातल्याच असल्यासारख्या वाटत. किंचित उभट चेहरा आणि मोठाले काळे डोळे! त्यांच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर त्यांचे टपोरे लालभडक ओठ एकदम उठून दिसत असत. मध्यम अंगकाठी, रुंद खांदा, भरलेले दंड, पाहताक्षणी डोळ्यात भरतील एवढे भव्य उरोज, त्याखाली अगदी सपाट पोट, दोन हातांमध्ये बऱ्यापैकी मावेल एवढी बारीक कंबर आणि कमरेखाली चालताना डुलणारे गरगरीत नितंब! एरवी दिवसभर त्या जास्तीत जास्त साडीवरच असत. मध्येच एखाद्या दिवशी अगदी घट्ट सलवार कमीज किंवा मग स्लीव्हलेस कुर्ती आणि जीन्सची थ्री फोर्थ घालत असत. त्यांच्या सोसायटीतील इतर तरुणींना आजकाल कोणताही मुलगा भाव देईनासा झाला होता. रोज सकाळी जॉगिंगला जाताना मात्र त्या घट्ट पांढरा टीशर्ट आणि ट्रॅकपॅन्ट घालत असत. त्या पेहरावात त्यांच्या शरीराचा एक ना एक अवयव अगदी स्पष्ट अधोरेखित होत असे. भराभर चालत असल्याने त्यांचे उरोज जोरजोरात वर खाली होत असत. टीशर्ट घट्ट बिलगल्याने त्यांच्या स्लिपचा व ब्राचा आकार त्यावर उठावदार होत असे पावलांच्या तालावर नितंब दोलायमान होत असत. खांद्यांच्या जरासं खालपर्यंत पोचणाऱ्या केसांची डोक्यावर उंच बांधलेली पोनी आणि त्याखाली गोरीपान मान! सकाळी व्यायामाला येणारे तरुणच काय पण त्यांचे वडीलही त्यांच्याकडे पुन्हा पुन्हा वळून पाहायचे. एखादी अभिनेत्रीदेखील त्यांच्या समोर फिकी पडावी असंच त्यांचं रूप होतं. त्यांच्याकडे पाहून कुणालाही असं वाटलं नसतं कि त्यांना पाच वर्षांची मुलगी असेल! त्यांनी अगदी नुकत्याच कॉलेजात जाऊ लागल्या मुलीसारखं स्वतःला मेंटेन केलं होतं.
त्याला वेड लागणं अगदी स्वाभिविक होतं. रात्रंदिवस त्यांचा विचार करणं, त्यांचे फोटो पाहणं आणि त्यांचा पाठलाग करणं (किंवा निरीक्षण करणं) एवढंच तो करत असे.त्याच्या कॉलेजातल्या दांड्या आता जरा जास्तच वाढल्या होत्या. कॉलेजच्या वेळेत मॉल, बाजार, मिटिंग्स, कॉन्फरन्स जिकडे मॅडम तिकडे हा मागे मागे पोचलाच म्हणून समजा. त्यांचा अख्खा दिनक्रम त्याला माहित झाला होता. डॉक्टरसाहेब बरेच प्रसिद्ध असल्यामुळे त्यांना खूप कमी वेळ मिळायचा. आठवड्यातून एखाद्या दिवशी ते मॅडमबरोबर मॉर्निंगवॉकला दिसायचे तेवढंच! त्याची अस्वस्थता वरचेवर वाढू लागली होती. अभ्यासातील लक्ष तर उडलंच होतं; आता घरातही तो चिडचिड करू लागला होता. दिवस दिवस आपल्या खोलीचं दार बंद करून तो आतमध्ये बसून राही. मॅडमना आठवून तासंतास आपल्या लिंगाशी खेळत बसे. आईबाबा दोघेही नोकरीसाठी सकाळी लवकर बाहेर पडत त्यामुळे त्याला घरी कुणी विचारणारे नव्हते. दिवसांमागून दिवस जात होते.
“बाबा! मला जिम जॉईन करायची आहे!” एकेदिवशी नाश्ता करता करता तो वडिलांना म्हणाला.
“क्काssss य? शुद्धीवर आहेस ना? सुधा! त्याला तापबीप आला आहे का बघ जरा!” त्यांचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.
“बाबा! खरंच!” तो प्लेटमधल्या पोह्यांमध्ये चमचा फिरवत बोलत होता.
“ठीक आहे तो पुनीत आहे ना आमच्या ऑफिसातल्या शर्मांचा मुलगा, त्याने जिम टाकली आहे . मी सांगतो त्यांना. तू जा उद्यापासून!” बाबा
“नको तिकडे! इकडे मागे जिम नाही का ती? फिटवेल? तिकडे जायचंय मला!” तो
“का? तिथे काय सोन्याची उपकरणं आहेत का?” बाबा हसत म्हणाले.
“बाबा थट्टा बास ना! प्लिज माझे मित्र तिथेच जाणार आहेत सगळे!” तो
“अच्छा! म्हणजे सामूहिक निर्णय आहे तर! म्हणजे समूहानेच बुडीत ही निघेल लवकरच!” बाबांनी आपले हात पुसले आणि चहा घेऊ लागले.
“नाही! नक्की!” तो
“माहिनाभराचे पैसे भरू! जर केलीस व्यवस्थित तर मेम्बरशीप घेऊन देईन नंतर!” बाबा
“चालेल! एक हजार रुपये द्या ना” तो.
“हं” बाबांनी हजाराची न काढून त्याला दिली.

दुसऱ्या दिवशीच संध्याकाळी बरोब्बर चार वाजता स्वारी जिममध्ये जाऊन, पैसे भरून वॉर्म अप करू लागली. सव्वाचार वाजता शर्वणीमॅडम जिममध्ये आल्या. त्या तिथेही जात तिथली सगळ्या लोकांचं लक्ष आपोआप त्यांच्याकडे वेधलं जाई. जिममधील सगळी मुलं भान हरपल्यासारखं त्यांच्याकडे पाहू लागली. पांढरा कुर्ता आणि स्किनफिट पांढरी लेगिंग मॅडमच्या सौंदर्याला मादक बनवत होती. मॅडम तडक आत चेंजिंग रूम मध्ये गेल्या. त्याने वॉर्मअप सम्पवून ट्रेनरने सांगितलेला व्यायाम करण्यास सुरुवात केली. काही मिनिटांतच मॅडम चेंज करून बाहेर आल्या. गुलाबी रंगाचा टँकटॉप आणि काळी योगापॅन्ट घालून मॅडम त्याच्या अगदी समोरच्या ट्रेडमिलवर येऊन उभ्या राहिल्या. त्याचा व्यायाम विसरून तो नेहमीप्रमाणे एकटक मॅडमकडे पाहू लागला. कानात हेडफोन अडकवत मॅडमने ट्रेडमिलवर धावण्यास सुरवात केली. त्याचा श्वासोच्छवास जणू जागच्या जागीच थांबला. धावताना उसळ्या मारणाऱ्या मॅडमच्या उरोजांवर त्याची नजर खिळली होती. मॅडमचं धावणं संपेपर्यंत त्याने ते मशीन बिलकुल सोडलं नाही. पूर्णवेळ तो मॅडम जिथे व्यायाम करतील त्याच्या आसपास घुटमळत राहिला. कधी वाकल्यावर दिसणारी स्तनरेषा तर कधी उसळणारे उरोज तर कधी टरारून फुललेले नितंब! जेवढं शक्य होईल तेवढं तो त्यांना आपल्या नजरेत साठवत होता. आता काहीही झालं तरी तो जिम चुकविणार नव्हता.

मॅडममुले तो नियमित जिमला जात होता. त्यामुळे बाबांनी त्याला आणखी सहा महिन्यांची मेंबरशीपही घेऊन दिली. त्याची शरीरयष्टी तर सुधारातच होती त्याबरोबर हळूहळू मॅडमचा व त्याचा परिचय वाढला. स्मिहास्यपासून ते विकेंड बॅडमिंटन सेशन्सपर्यंत मजल त्याने मारली. बॅडमिंटन खेळताना तर त्याची चांगलीच पंचाईत होत असे. एखादं दुसरी मॅचही जिंकणं त्याच्यासाठी अवघड होतं. कारण त्याचं लक्ष शटलकॉक पेक्षा बॉल्सवरच जास्त असायचं.
आता मॅडम त्याला चांगल्या ओळखू लागल्या होत्या. रोज ते एकत्रच गप्पा मारत जिमला येत व परत जातानाही एकत्रच जात. कधी बाहेरही भेट झाली तर मॅडम निदान स्मितहास्य करून तरी जाऊ लागल्या. आता त्याचा धीर हळूहळू वाढू लागला होता आणि अपेक्षाही!
इतके दिवस बाथरूमध्ये केलेला कल्पनाविलास सत्यात उतरविण्याची घाई त्याला होऊ लागली होती. अर्थातच मॅडमच्या मनात तसं काहीही नव्हतं. त्याची अस्वस्थता मात्र वरचे वर वाढत चालली होती.

एके दिवशी बॅडमिंटन खेळताना त्याला शर्वणी मॅडम कडून कळालं की दुसऱ्या दिवशी डॉ. कामत कॉन्फरन्ससाठी आठ दिवसांसाठी यूएसला जाणार आहेत. त्या रात्री त्याला झोप लागली नाही. काहीही झालं तरी ही संधी सोडायची नाही हे त्यानं पक्कं ठरवलं. आख्खी रात्र त्याने प्लॅनिंग करण्यात घालविली. दुसऱ्या दिवशी दुपारी मॅडमना मॉलमध्ये गाठलं. कधी नव्हे ते आईशी भांडून तो महिन्याचं किराणा सामान आणायच्या निमित्ताने तिथे टपकला.
“हाय!” तो मॅडमच्या शेजारी जाऊन उगाच रॅकवरील बाटल्या चापपू लागला.
“अरे आशु तू?” मॅडमने स्मितहास्य करत प्रतिसाद दिला.
“शर्वणीमॅडम एक काम होतं तुमच्याकडे!” तो
“बोल ना!” मॅडम
“माझ्या दाढा किडल्या आहेत” तो.
“काढून टाकता येतात.” मॅडम सामान घेत पुढे सरकत होत्या आणि त्यांच्या पाठोपाठ तोही!
“किती खर्च येतो!” त्याने पुढचा प्रश्न विचारला.
“तू माझी फीज बुडवण्याच्या विचारात आहेस तर!” मॅडम.
“तसं नाही मॅडम! ठीक आहे मग क्लिनिकला कधी येऊ” तो
“मस्करी केली रे! पण मी बाहेर ट्रीटमेंट करत नाही. तू उद्या क्लिनिकला ये सकाळी पाहू आपण!” मॅडम
“उद्या सोमवार आहे! तुमचं क्लिनिक बंद असतं ना!” तो
“अरे हो! ठीक आहे पण! असंही काही काम नाहीये. ये तू उद्या!”
तो जाम खुश झाला. भराभर सामान घेऊन घरी गेला आणि उद्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागला. दुसऱ्या मॅडमने सांगितल्याप्रमाणे तो क्लिनिकला पोचला. त्याला तिथे कुणीही दिसेना. रिसेप्शनच्या समोर पेशन्ट्स साठी वेटिंग एरिया होता आणि मुख्य दरवाजाच्या अगदी समोर एक गोलाकार जिना वरच्या मजल्यावर गेला होता. जिन्याच्या दोन्ही बाजूंना दोघांच्या केबिन्स होत्या. डॉक्टरांच्या रूमला जोडून पलीकडे एका खोलीत बरीच मोठमोठाली उपकरणं ठेवलेली दिसत होती. तो कचरत कचरत आत गेला. रिसेप्शन जवळ जाऊन तो तिथे कुणी आहे का हे पाहू लागला. पण तिथे कुणीच नव्हते. शेवटी तो वेटिंग एरियामधल्या एका खुर्चीत जाऊन बसला. काही वेळाने दरवाजाचा आवाज झाला तो आवाजाच्या दिशेने पाहत होता. मॅडम वरून जिना उतरत खाली येत होत्या.
त्यांनी आपले भुरे केस रिकामे सोडले होते. कमनीय कमरेच्या खाली नेसलेली राखाडी रंगाची सुती साडी आणि मनगटापर्यंत ट्रान्सपरंट बाह्या असणारा काळा ब्लाउज त्यांचा बांधा अधोरेखित करत होते. पदराआडून त्यांचं गोरंपान पोट डोकावत होतं. पायऱ्या उतरत असताना आपल्या नाजूक बोटांनी त्यांनी साडीच्या निऱ्या धरून ठेवल्या होत्या. टपोरे ओठ फिकट गुलाबी रंगाच्या लिपस्टिकने आखून घेतले होते. डोळ्यांत काजळ घातल्याने ते आणखीच उठावदार झाले होते. त्यांनी आपल्या केबिनमध्ये जाता जाता त्याला आत येण्याची खूण केली. तो मॅडमच्या मागोमाग आतमध्ये गेला. मॅडम आपल्या खुर्चीत जाऊन बसल्या. तो माडांसमोर येऊन बसला.
“हं बोल आता!” मॅडम ड्रॉवरमध्ये काहीतरी शोधत बोलल्या.
“डाव्या बाजूच्या दाढा खूप किडल्या आहेत. सगळं अडकतं खाताना त्यात!” त्याचं सगळं लक्ष मॅडमच्या छातीकडे होतं.
“काही त्रास होतो का तुला त्याचा?” मॅडम
“दुखत नाहीत तशा पण जेवण झालं की खूप अस्वस्थ व्हायला होतं. ते अडकलेलं निघतही नाही लवकर!” तो
“टोकदार वस्तू घालत नाहीस ना त्यात?” मॅडम एका रजिस्टरमध्ये काहीतरी खरडत होत्या.
“नाही! ब्रश करतो. पण बाहेर असल्यावर काही करता येत नाही ना!” तो
“हं! जाऊन त्या समोरच्या खुर्चीवर बस!” मॅडम
तो उठून समोरच्या डेंटिस्टच्या खुर्चीवर जाऊन पडला. मॅडम हातात चमच्यासारखं काहीतरी आणि एक टॉर्च घेऊन तिथे आल्या.
“आ कर मोठा!” मॅडमने संगतल्याप्रमाणे त्याने मोठा आ केला. मॅडम वाकून त्याच्या तोंडात टॉर्चचा उजेड टाकत पाहू लागल्या. वाकलामुळे त्यांच्या साडीचा पदर छातीवरून थोडा खाली सरकला. त्यांच्या डाव्या स्तनाची दंडाकडील गोलाकार कड थोडीशी उघडी पडली आणि दोन्ही स्तनांच्या मधील फट वरून दिसू लागली. त्याच्या लिंगात रक्तप्रवाह वाढू लागल्याचं त्याला जाणवू लागलं.
“बऱ्याच किडल्या आहेत रे! घाण काढून छिद्र बंद करून टाकुयात आपण!” मॅडम टॉर्च बंद करत बोलल्या.
“मला भीती वाटते खूप!” तो सरळ उठून बसत बोलला. हातानं त्याने आपलं लिंग आपल्या हाताने एकदा खाली दाबलं!
“काही नाही होणार. आणि आता ट्रीट नाही केलंस तर कीड मुळापर्यंत पोचेल मग काढून टाकाव्या लागतील दाढा!” मॅडम आपल्या खुर्चीकडे जात बोलल्या. त्यांच्या उघड्या रुंद गोऱ्यापान पाठीच्या मध्यावर ब्लाउज आणि ब्रा च्या दाबाने अधिरेखित झालेल्या घळईवर त्याची नजर गाडली गेली होती. अचानक भानावर येत तो बोलला, “कधी करायचं?”
“आत्ता एक करूयात तीन चार दिवसांच्या फरकाने उरलेल्या करूयात!” मॅडम
“आत्ता?” हा खरंच घाबरला
“मग कधी?” मॅडम पुन्हा बाजूच्या कपाटात काहीतरी शोधू लागल्या. तो धीर एकवटून पुन्हा खुर्चीवर पडला. मॅडमने जवळ येत त्याला आ करायला सांगून त्याच्या तोंडाला कसलीशी क्लिप अडकवली. त्याने आपल्या मुठी घट्ट आवळून धरल्या. मॅडमने वरची लाईट चालू केली आणि त्याच्या नकळत त्याच्या हिरड्यांमध्ये कसलंसं इंजेक्शन दिलं. नंतर त्यांनी एक पेनसारखं छोटंसं मशीन सुरु केलं. त्याने हाताने खुर्चीची कड घट्ट आवळून धरली होती. डोळे गच्चं मिटून घेतले होते. नकळत मॅडमच्या साडीच्या निऱ्याही त्याच्या हातात आल्या होत्या. काहीतरी टेबलावर विसरल्यामुळे त्या मशीन ठेऊन टेबलकडे जाऊ लागल्या. त्याच्या हातात आलेल्या असल्याने त्यांच्या साडीच्या निऱ्या झटक्यात ओढल्या जाऊन त्यांची साडी निसटली. पोटाखाली खोचलेल्या सगळ्या निऱ्या सुटून आल्या.
“अरे देवाsss!” म्हणत मॅडमने झटकन साडी धरून ओढली. साडी ओढली गेल्यावर त्याला जाणवलं आणि त्याने डोळे उघडले. मॅडमने साडी गोळा करून तोंड फिरवलं होतं. तो उठून बसला आणि आपल्या तोंडातली क्लिप काढून ठेवली. ब्लाउज आणि कमरेला गुंडाळलेल्या साडीच्या मधला पाठीचा बाक त्याला खुणावत होता. इतके दिवस या क्षणाचीच तो वाट पाहत होता पण आता तो इतका घाबरला होता की थरथर कापू लागला होता. मॅडमनाही काय करावं ते सुचत नव्हतं. त्या गडबडीत कशाबशा निऱ्या बांधण्याचा प्रयत्न करत होत्या. तो तिथून उठला आणि बाहेर जाऊन विचार करू लागला. ते दृश्य त्याच्या डोळ्यांसमोरून हलत नव्हतं. निघून जावं की इथेच थांबावं हे त्याला कळेना. तेवढ्यात मॅडमने दरवाजा उघडला. मॅडमनाही लाजल्यासारखं झालं होतं. तरीही धीर एकवटत त्या बोलल्या, “किती घाबरतोस तू? चल बस!”
“नको मॅडम मला खूप भीती वाटते!” तो
“नंतर त्रास होईल खूप!” मॅडम
“होऊ द्या!” त्याची नजर जमिनीत गाडली गेली होती.
“घाबरू नकोस! तुला कळणारही नाही!चल” मॅडम दरवाजा उघडून आत जाऊ लागल्या.
“नको! मी जातो!” असं म्हणून तो पळतच तेथून निघून गेला. तिथून निघालो तो थेट घरी बाथरूममध्येच शिरला. हलका होऊन बेडवर पडला. मॅडमची ती पाठमोरी आकृती काही केल्या त्याच्या डोळ्यांसमोरून हलेना. आपला मोबाईल उचलून त्याने मॅडमना व्हाट्सअपवर मेसेज पाठवला, “आय एम सॉरी!” आणि मोबाईल बंद करून झोपला. दोन दिवस तो घराबाहेर पडला नाही. मोबाईलही बंद करून ठेवला.एवढंच काय तो जिमलाही गेला नाही.

You cannot copy content of this page