मित्राची बायको निकिता

मी आणि विनय गल्लीतले दोस्त. मी त्याच्या पेक्षा दोन तीन वर्षांनी मोठा होतो. आमची शाळा वेगळी होती, कॉलेज वेगळे होते. पण आम्ही खूप चांगले मित्र होतो. मी मोठा असल्याने तो नेहमी मला सल्ले विचारात असे. माझे शिक्षण, माझी नोकरी आणि मी व्यवस्थित राहतो यामुळे त्याच्या घरी देखील चांगला मान होता. त्याचे आई वडील देखील मला नेहमी विचापूरस करत असत. काही वेळा तो तक्रार करायचा कि त्याच्याच घरी त्याच्या पेक्षा माझे जास्त ऐकले जाते. कोणताही मोठा निर्णय घेताना ते मला विचारत असत.

मी नोकरी करत होतो तर विनय चे साडी चे दुकान होते. धंदा खूप चांगला चालायचा आधी त्यांचा. पण माहित नसे कसे पण विनय ला भिशी आणि व्याजाने पैसे घेण्याचा नाद लागला होता. त्यातून हळू हळू करत त्याचा धंदा बसू लागला होता. म्हणावे तसे गिऱ्हाईक होत नव्हते. त्यामुळे त्याचे दारू पिण्याचे प्रमाण वाढले होते. तो रोजच दारू पिऊन येऊ लागला होता.

त्यातच त्याचे लग्न होऊन दोन एक वर्ष झाले होते. पण याचा त्याच्यावर काहीही फरक पडला नव्हता. त्याच्या या वागण्याने त्याचे आई वडील त्याला सोडून गावी जाऊन राहिले होते. त्यामुळे घरी तो आणि त्याची बायको निकिता दोघेच राहत होते. माझे त्यांच्या घरी सारखे येणेजाणे होते. निकिता ला देखील माहित होते कि विनय माझ्या शब्दाबाहेर जात नाही. कोणाची नाही ऐकले तरी तो माझे नेहमी ऐकत असे.

मी कधीही निकिताशी फार बोललो नव्हतो. कधी घरी गेल्यावर जुजबी जे बोलणे व्हायचे तेवढेच. निकिता सुशिक्षित होती. तिचे पोस्ट ग्रॅज्युएशन झाले होते. तर विनय दहावी नापास होता. त्यामुळे मुळातच त्यांच्या विचारांमधे खूपच फरक होता. त्यामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होत असत. माझे शिक्षण देखील चांगले झाले होते. त्यामुळे कदाचित माझे आणि निकिताचे विचार जुळत होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page