साली आधी घरवाली

माझे लग्न होऊन तीन वर्षे झाली होती. आमचा संसार सुखाचा चालू होता. त्यातच माझी बायको आता गरोदर होती. मी आणि माझी बायको दोघेच राहायचो. त्यामुळे तिला पाहिजे नको ते बघायची सगळी जबाबदारी माझ्यावरच असायची. दिवस जातील तसे तिची अवस्था बिकट होत गेली आणि माझ्या कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून मला तिच्याकडे म्हणावा तसा वेळ देता येत नव्हता.

माझी होणारी ओढाताण बघून माझी बायको एके दिवशी मला म्हणाली “अहो ऐका ना. तुमची इतकी ओढाताण होत आहे. माझ्यामुळे तुमच्यावर खूप ताण येत आहे. त्यामुळे मी माझ्या बहिणीला माझ्या मदतीसाठी बोलावूं घेऊ का?”

सोनम, माझी मेहुणी. तिचे अजून लग्न व्हायचे होते. ती कॉलजेला जायची. गव्हाळ वर्णाची सोनम दिसायला तशी देखणी होती. उंच, कडक फिगर आणि चेहऱ्यावर सतत हास्य यामुळे तिच्याकडे कोणीही लगेचच आकर्षित होत असे.

मी तिचा आवडता जीजू होतो. माझे आणि तिचे चांगले जमायचे. ती माझ्या कॉलेजच्या मैत्रिणी सारखीच माझ्याशी नेहमी वागायची. मी आणि माझ्या बायकोची कधी भांडणे झाली तर मी तिला सगळं सांगायचो. ती नेहमी माझी बाजू घेत असे. ती घरी येणार म्हणून मी अजिबात आढेवेढे घेतले नाहीत. मी तात्काळ संमती दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page