बॉयफ्रेंड की गर्लफ्रेंड

मी सीमा. मी आता बावीस वर्षांची तरुणी आहे. लहापणापासून मुलीच्या शाळेत शिकले. पुढे कॉलेज देखील मला मुलींचेच मिळाले. त्यामुळे कोणा मुलाबरोबर माझा कधी कोणत्याही गोष्टीसाठी संबंध आला नाही. बॉयफ्रेंड तर दूरची गोष्ट मला साधा कोणी जवळचा मित्र देखील नव्हता. वाढत्या वयातील सगळ्या भावना मला देखील होत्याच पण त्या पूर्ण करण्यासाठी माझ्य जवळ कोणी नव्हते हे माझे दुर्दैवच होते म्हणा.

मी कॉलेज ला गेली तशी मला एक चांगली मैत्रीण झाली. मीरा तिचे नाव. ती देखील माझ्या सारखीच आधी मुलींच्या शाळेत होती आणि आता माझ्याच म्हणजे फक्त मुलींच्या कॉलेज मध्ये तिने प्रवेश घेतला होता. मीरा एका बड्या घरातील मुलगी होती. तिचे वडील मोठे व्यवसायिक होते. त्यामुळेच मीरा चे राहणीमाण देखील तसेच उच्च दर्जाचे होते. ती कॉलेज ला नेहमी नवनवीन ड्रेस घालून येत असे.

मी आणि ती अगदी पहिल्याच आठवड्यात मैत्रिणी झालो. थोड्याच दिवसात आम्ही चांगलेच जवळ आलो होतो. तिला देखील माझ्या सारखेच कोणी मित्र वगैरे नव्हते. त्यामुळे आम्ही तसे समदुःखी होतो. आम्ही एकमेकाबरबर सगळ्या गोष्टी बोल्ट असू. मीरा वरचेवर माझ्या घरी येत असे. माझ्या पालकांशी देखील तिचा चांगला परिचय झाला होता. पण मी अजून तिच्या घरी कधी गेले नव्हते.

एक दिवस तिने मला तिच्या घरी बोलावले. मी बिचकतच तिच्या घरी गेले. तिचे घर म्हणजे एक प्रकारे राजवाडाच होता. भल्या मोठ्या घरात ती तिच्या आई वडिलांसमवेत राहायची. तिची स्वतःची वेगळी खोली होती. तिने मला तिचे घर दाखवले आणि आम्ही तिच्या बेडरूम मधे गेलो. तिची बेडरूम अतिशय सुरेख होती. मऊमऊ गाडी, उशी, तक्या, उबदार पांघरूण, एसी अजून काय हवे होते दुसरे. आम्ही दिवसभर गप्पा मारल्या आणि मी निघाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page