आंधळी कोशिंबीर

मी उन्हाळ्याच्या सुट्टीला मामाकडे गेलो होतो. लहान होतो तेव्हा वारंवार माझे जाणे व्हायचे. पण जसा मोठा होऊ लागलो तसे माझे जाणे कमी झाले. याचे कारण म्हणजे माझ्या बरोबरीचे तिकडे कोणीच नव्हते. त्यामुळे मी शक्यतो तिकडे जाणे टाळतच असे.

मामाचे घर खूपच मोठे होते. जुन्या पद्धीतीचे ते दुमजली घर तसे मला खूप आवडायचे. पण शेवटी बरोबरीचे कोणी नसेल तर काय उपयोग ना. घरी मामा मामी आणि त्यांची दोन लहान मुले एवढेच असायचे. यावेळी मामाने मला खूपच आग्रह केला म्हणून मी मामाकडे सुट्टीसासाठी जायचे ठरवले.

मी मामाच्या घरी पोहोचलो. मी माझी एस वाय बी कॉम ची परीक्षा दिली होती. रिजल्ट येण्यास खूप अवधी होता. मी गेलो तेव्हा सगळे घरीच होते. खूप दिवसांनी आल्याने माझे खूप कौतुक सगळ्यांनी केले. त्याच वेळी मामीची सख्खी बहीण सोनल देखील सुट्टीसाठी आली होती.

सोनल माझ्यापेक्षा एक वर्षाने लहान होती. आम्ही लहानपणी भेटायचो. त्यानंतर आम्ही आजच भेटत होतो .लहानपणी शेंबडी दिसणारी सोनल आता एक पूर्ण भरलेली बाई झाली होती. तिला बघून मी थोडा अचंबित च झालो. लहापणीची सोनल हीच का असा प्रश्न मला पडला.

Leave a Comment

You cannot copy content of this page