तो मी आणि तो

माझे नाव संतोष. हॉस्टेल वर राहण्याची मजा काही औरच असते. मी तर किती तरी वर्ष शिक्षणा निम्मित हॉस्टेल वर राहिलो होतो. पुढे शिक्षण संपून नोकरी मिळाली ती देखील दूर शहराच्या ठिकाणी. त्यामुळे पुन्हा एकदा मला घरा पासून लांब रहाव लागणार होते. पण यावेळी मी हॉस्टेल ला रहाणार नव्हतो तर मी फ्लॅट मध्ये राहणार होतो. आमच्याच कंपनी चे क्वार्टर्स होते. मी तिकडेच राहणार होतो. त्यामुळे मला थोडे बरे वाटत होते.

एका रूम मध्ये तीन लोक राहायचे होते. तीन बेड आणि प्रत्येकाला आवश्यक साहित्य अशी त्या रूम्स ची व्यवस्था होती. रूम चांगली होती त्यामुळे ती बदलायची नाही हे मी मनात ठरवले होते. माझ्या रूम मध्ये माझ्या बरोबर अजून एकच जण होता. सुरेश नाव होते त्याचे. तो परराज्यातील होता. पण बोलायला चांगला होता. थोड्याच दिवसात आमचे चंगले सूत जमले. आम्ही खूप मनसोक्त गप्पा मारायचो.

मला मुलीकडे अजिबात आकर्षण वाटत नसे. मी मुलांकडे मात्र लगेच आकर्षित होत असे. नाही म्हणायला कॉलेज ला असताना मी काही वेळा काही मुलांचे चुंबन देखील घेतले होते. पण पुढे काही त्याचे झाले नाही आणि तो विषय तिकडेच संपला.

सुरेश दिसायला छान होता. मुळात तो शहरातीलच असल्याने तसा नाजूक होता. थोडासा मुलींसारखे त्याचे हावभाव होते. थोड्याच दिवसात मला समजले कि त्यालाही माझ्यासारखेच मुलांचे आकर्षण होते.माझ्यासाठी हे एक चांगलेच लक्षण होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page