नथीचा नखरा

रक्षिता आणि विहानच्या लग्नाला ५ वर्षे झाली होती. दोघांचेही लव्ह मॅरेज होते. पण दोघांच्या नात्याकडे बघून असं वाटत होतं कि दोघांना जबरदस्तीने लग्नाच्या बंधनात अडकवले गेले होते. त्यांच्या नात्यामधील सुख हे कुठच्या कुठे निघून गेले होते. दोघेही जॉबला असल्याने सकाळी ९ वाजता घर सोडायचं आणि मग रात्री ७ – ८ वाजता घरी यायचं. घरी आल्यावर ती स्वयंपाकघरात आणि तो टीव्ही समोर असायचा. महिन्यातून फक्त एक ते दोन वेळा दोघांमध्ये शरीरसंबंध व्हायचे. ‘करियर’ च्या कारणास्तव त्यांनी अजून अपत्य जन्माला घातले नव्हते. कोणाचा वाढदिवस आला कि मग ठरल्याप्रमाणे गिफ्ट्स वगैरे द्यायचे आणि हॉटेल मध्ये जाऊन जेवायचे. यापलीकडे अजून कोणतेही एन्जॉयमेंट त्यांच्या आयुष्यात नव्हते. दोघे एकमेकांपासून दूर जाऊ लागले होते. सुट्टी मिळत नाही या कारणाने कुठे फिरायला देखील जाणे होत नव्हते. विहानचे आई वडील हे त्याच्या लहानपणी वारले होते तर रक्षिताचे आई वडील हे गावी राहत होते. बरं सोशल मीडियावर दोघेही ऍक्टिव्ह होते. सोशल मीडियावर लोकांना असं वाटायचं कि यांचं खूप सुंदर चालू आहे पण खऱ्या आयुष्यात काय सुरु आहे हे त्या दोघांनाच माहित होतं. रात्री झोपताना एकमेकांकडे पाठ करून मग मोबाईलची लाईट रात्रभर सुरु असायची. त्यामुळे एकमेकांबद्दलच्या संशयाची सुई दोघांनाही टोचत होती. पण एकमेकांना काही न बोलता दोघेही गप्प राहायचे. नॉर्मल हसणं नॉर्मल बोलणं नॉर्मल काळजी घेणं सगळं नॉर्मल होतं पण त्यांचं आयुष्य हे ऍबनॉर्मल पद्धतीने पुढे सरकत होतं.

रक्षिता हि रंगाने सावळी परंतु दिसायला खूप सुंदर होती. दररोज सकाळी जॉगिंग आणि योगा करून कोणालाही मोहून टाकेल असे तिचे सावळे सुंदर रूप बनले होते. सुंदर अशा रक्षिताची त्वचा इतकी मखमली होती कि त्यावरून एखादे मोराचे पीस देखील सर्र्कन सरकून खाली पडेल. तिचे मध्यम बांध्याचे शरीर आणि पाठीपर्यंत वाढलेले काळेभोर केस. त्या केसांना तिने फिकट तांबड्या रंगाने काही ठिकाणी माखून टाकले होते. तिच्या नाकामध्ये नेहमीच एक लहानशी रिंग असे. डोळ्यांमध्ये गडद काजळ भरलेले असल्याने कोणालाही ती पाहताक्षणीच आकर्षित वाटे. रक्षिताचे उभार हे ३६ इंचांचे आणि तिचे दोन्ही डोंगर ३८ चे होते. उंची ५.७ असल्याने तिला ते मस्त शोभून दिसत होते. मखमली शरीरावर रक्षिताने बऱ्याच ठिकाणी टॅटू ओढवले होते. तिच्या ३२ च्या कमरेवर उजव्या बाजूला एक नागाचा टॅटू होता. तसेच तिच्या एका उभारावर रक्षिता या नावामधल्या ‘आर’ या अल्फाबेटचा टॅटू काढलेला होता. तिच्या सावळ्या पाठीवर डाव्या बाजूला एका अनोळखी मुखवट्याचा टॅटू तिने गोंदवून घेतलेला होता. ज्यावेळी ती बॅकलेस ड्रेस परिधान करीत असे तेव्हा तिचा तो पाठीवरचा टॅटू बघून पुरुषांसोबत महिलांची गरमी सुद्धा वाढत असे इतका तो टॅटू हॉट होता. विहान हा सुद्धा अतिशय देखणा आणि दररोज व्यायाम केल्याने स्वतःला फिट ठेवणारा होता. त्याचे मसल्स बघून तर सोसायटीमधल्या मुली आणि बायका देखील वेड्या होत असत. जिम मध्ये तो जेव्हा व्यायाम करीत असे तेव्हा त्याचे फुगणारे मसल्स बघून मुलींच्या शरीराला घाम फुटत असे. दोघेही एकमेकांना शोभून दिसणारे होते. पण म्हणतात ना घरातलं कितीही चविष्ट आणि सुंदर असलं तरी शेजारी बनवलेल्या जेवणाची ओढ मात्र काही केल्या जात नाही. जेव्हा नवरा आणि बायकोमधले प्रेम कमी होते तेव्हा मग शेजारी बनणाऱ्या जेवणाची चव अजूनच रुचकर लागते. त्याचप्रमाणे विहान हा त्याच्या जिम मधल्या एका तरुणीच्या प्रेमात पडला होता तर रक्षिता हि तिच्या ऑफिसमधल्या कलिगच्या. त्यामुळे रात्रभर त्यांचे मोबाईलवर त्यांच्यासोबत बोलणे असायचे. पण शेजारचे जेवण इतके जरी आवडत असले तरी दोघांनीही अजून त्या जेवणाची चव चाखली नव्हती. म्हणजे रक्षिता आणि विहान यांचे त्यांच्या आवडत्या व्यक्तीसोबत फक्त बोलणे चालणे असायचे पण अजून त्यांनी मर्यादा ओलांडलेली नव्हती.

बऱ्याच वर्षांनी त्यांच्या सोसायटीमध्ये ‘होम मिनिस्टर’ हि स्पर्धा आयोजित केली होती. सोसायटीमधल्या हौशी तरुणांनी हि स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये सोसायटीमधल्या सर्व जोडप्यांनी सहभागी व्हायचे होते. रविवार असल्याने कोणालाही त्यापासून सुटका नव्हती कारण रविवारी सर्वांनाच सुट्टी असते. स्पर्धेचा दिवस उजाडला. संध्याकाळचे ७ वाजले तेव्हा सोसायटीमधील सगळी जोडपी सोसायटीच्या गच्चीवर जमली. त्यामध्ये साहजिकच रक्षिता आणि विहान हे दोघेही होते. हि स्पर्धा जिंकणाऱ्याला एक सुंदर अशी हिऱ्यांनी जडलेली सोन्याची नथ मिळणार होती. त्यामुळे सगळेच हि स्पर्धा जिंकण्यासाठी उत्सुक होते. या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या फेऱ्या होत्या आणि प्रत्येक फेरीमध्ये वेगवेगळे खेळ होते. पहिल्या फेरीमध्ये सर्व जोडप्यांनी सहभाग घेतला. त्यामध्ये एक मोठी रिंग हि दिलेली होती आणि त्या रिंगमध्ये प्रत्येक जोडप्याला उभे केले होते. त्या रिंगमध्ये दोघांनीही उभे राहून ती रिंग हि प्रत्येक जोडप्यामधल्या नवऱ्याने जमिनीवरून उचलून मग डोक्याच्या वरून ती बाहेर काढायची होती. पण ती रिंग काढताना तिचा दोघांच्याही शरीराला स्पर्श होता कामा नये. त्यासाठी त्या रिंगला एक असे यंत्र बसवले होते. जर त्या रिंगचा दोघांपैकी कोणाच्याही शरीराला स्पर्श झाला तर त्यावरचा अलार्म आणि लाईट लागणार होती. ती रिंग उचलण्यासाठी प्रत्येक नवऱ्याला हॅन्ड क्लोव्हस दिले होते त्यामुळे हाताचा स्पर्श त्या रिंगला झाल्यावर अलार्म वाजणार नाही तर जेव्हा शरीराचा स्पर्श होईल तेव्हाच अलार्म वाजेल. शिट्टी वाजल्यावर प्रत्येक जोडप्यातील नवऱ्याने जमिनीवरून ती रिंग उचलली आणि हळू हळू ती वर काढण्याचा प्रयत्न करू लागले. वर काढताना बऱ्याच जोडप्यांच्या शरीराला त्या रिंगचा स्पर्श होऊन ती जोडपी स्पर्धेतून बाद करण्यात आली. पण इकडे विहान हा हळुवारपणे आणि अत्यंत चतुराईने ती रिंग हळू हळू वर उचलत होता. रक्षिता सुरवातीला या खेळामध्ये इतकी रुची दाखवत नव्हती पण ज्याप्रमाणे विहान हा त्या खेळामध्ये उत्साह दाखवू लागला तसे रक्षिताही या खेळामध्ये स्वतःचा आनंद दाखवू लागली. रिंग वर उचलताना विहानच्या चेहऱ्याचा स्पर्श हा रक्षिताच्या पोटाला होत होता. तसेच त्याच्या शरीराच्या प्रत्येक भागाचा स्पर्श हा रिंग उचलताना रक्षिताच्या शरीराला होत होता. जेव्हा विहानने रिंग उचलून दोघांच्याही चेहऱ्यासमोर आणली तेव्हा विहानचे लक्ष रक्षिताच्या डोळ्यांकडे गेले. त्याने पाहिले रक्षिता विहानच्या चेहऱ्याकडे बघत होती. दोघांचीही नजर एकमेकांना भिडली आणि दोघांच्याही चेहऱ्यावर एक वेगळीच स्माईल आली. बऱ्याच दिवसांनी दोघांनाही हि स्माईल बघायला मिळाली होती. रक्षिताने लाजून तिची नजर खाली केली आणि त्या लाजण्याने विहानच्या मनाला सुखद आनंद मिळाला. विहानने रक्षिताच्या डोळांमध्ये बघतच ती रिंग व्यवस्थितपणे दोघांच्याही शरीराला स्पर्श न करता डोक्याच्या भागाने बाहेर काढली आणि त्यांनी पहिली फेरी सहजच पूर्ण केली. त्यांच्यासोबत आणखीन ९ जोडप्यांनी हि फेरी पूर्ण केली होती. १५ जोडप्यांमधले ६ जोडपी या स्पर्धेतून बाद झाली होती. टाळ्यांच्या कडकडाटामध्ये ९ जोडप्यांचे अभिनंदन करण्यात आले. हे पाहून रक्षिता देखील खुश झाली आणि तिने विहानकडे बघून एक छान स्माईल दिली. ती त्याला म्हणाली, “विहान खरंच खूप मस्त केलंस रे तू” यावर विहान सुद्धा रक्षिताकडे बघून प्रेमाने म्हणाला, “रक्षू… तुझ्यासाठी काही पण” विहानच्या या बोलण्यावर रक्षिता लाजून लालबुंद झाली. दोघांमधले प्रेम हे हळू हळू पुन्हा जागे होत होते.

आता दुसऱ्या फेरीमध्ये ९ जोडप्यांनी प्रवेश केला. या फेरीमधला खेळ असा होता कि यामध्ये नवऱ्याने नवरीला आपल्या दोन्ही हातांनी बहोपाशात उचलून घ्यायचे आणि पुढे पळत जाऊन १०० मीटरवर ठेवलेल्या खुर्चीपर्यंत यायचे. त्या खुर्चीमध्ये चमचा गोटी ठेवलेली असणार. नवऱ्याच्या कुशीमध्ये असलेल्या नवरीने तो चमचा घेऊन नवऱ्याच्या तोंडात ठेवायचा आणि मग त्यामध्ये ती गोटी व्यवस्थित ठेवायची. नवऱ्याने त्यानंतर नवरीला तसेच हातांमध्ये उचललेल्या अवस्थेत आणि तोंडामधल्या चमच्यामधली गोटी बॅलेन्स करून पुन्हा १०० मीटर मागे यायचे आहे. जर परत येताना गोटी खाली पडली तर ते जोडपे बाद करण्यात येईल आणि यामध्ये वेळेनुसार परत येणाऱ्या फक्त ५ जोडप्यांना पुढच्या फेरीमध्ये प्रवेश मिळणार होता. सर्व जोडपे स्पर्धेसाठी तयार झाले आणि शिट्टी वाजल्यावर विहानने आपल्या दोन्ही हातांनी रक्षिताला आपल्या दोन्ही हातांमध्ये उचलले. रक्षिताने विहानच्या गळ्याभोवती दोन्ही हात टाकले आणि त्याच्या डोळ्यांमध्ये बघून हलकीशी हसली. विहान तिला घेऊन पुढे पळत जाऊ लागला. खुर्चीपाशी आल्यावर रक्षिताने पटकन चमचा विहानच्या तोंडामध्ये ठेवला आणि त्यावर गोटी ठेवली. विहान मागे फिरला आणि रक्षिताला परत घेऊन चालू लागला. त्याचे सगळे लक्ष त्या चमचा गोटीकडे होते पण रक्षिताचे लक्ष त्याच्या नजरेवर होते. त्यामधली तीन जोडपी परतताना त्यांच्या चमच्यामधून गोटी खाली पडून ती बाद झाली. उरलेल्या सहा जोडप्यांमधल्या दोन जोडप्यांमधल्या नवऱ्याच्या हातातून नवरी खाली निसटली आणि त्याचसोबत चमच्यामधून गोटी देखील खाली पडली. एका जोडप्याच्या चमच्यामधून गोटी खाली पडली पण नवरीने ती झेलली आणि पुन्हा त्या चमच्यामध्ये ठेवली. पण परीक्षकांनी त्या जोडीला बाद केले. त्यामुळे फक्त तीन जोडपी या स्पर्धेमध्ये राहिली होती. विहानच्या मजबूत हातांच्या कुशीमध्ये असलेल्या रक्षिताला स्वर्गामध्ये असल्यासारखे भासत होते. खूप वर्षांनी विहानने असे आपल्याला कुशीमध्ये उचलून घेतले असावे असे रक्षिताला वाटू लागले. तिने विहानच्या गळ्याभोवती असलेली स्वतःच्या हातांची पकड घट्ट केली आणि मग विहानचे लक्ष रक्षितच्या डोळ्यांकडे गेले. रक्षिताच्या डोळ्यांमध्ये त्याला हरवलेले प्रेम दिसू लागले. ती त्याला डोळ्यांनी इशारा करीत होती कि चमचा आणि गोटीकडे लक्ष दे नाहीतर खाली पडतील पण विहानचे लक्ष फक्त आणि फक्त रक्षिताच्या डोळ्यांकडे होते. त्याने रक्षिताला घेऊन कधी सीमा रेषा पार केली हे त्याला देखील समजले नाही. ज्या वेळी प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गडगडाट झाला तेव्हा ती दोघे भानावर आली. विहान आणि रक्षितासोबत आणखीन दोन जोडपी शेवटच्या फेरीमध्ये पोहोचले होते.

Leave a Comment

You cannot copy content of this page