पावसाळ्यातील वसंत

आज खूप दिवसांनी खारघरच्या मॉल मध्ये जाणं झालं. सरकत्या जिन्यावर ही मी पटापट पायऱ्या चढत वर चाललो होतो. खूप दिवसांनी नवीन काही तरी वाचायचं ठरवलं होतं. मी ‘बुकफेअर’ च्या दुकानात पोहोचलो आणि काऊंटर वर काही बोलणार तेवढ्यात तिथल्या बाईंनी मी मागावायला सांगितलेले पुस्तक माझ्या समोर ठेवले.

” अरे व्हा! या वेळी लवकर आलं. ” मी स्माइल देत म्हणालो.

” हो तू सांगितलंस आणि मी लगेच ऑर्डर टाकली ” बाई म्हणाल्या.

” खूप खुप थँक्स! ” मी पुस्तकाकडे पाहत म्हणालो ” सेपिअन्स ” नाव होत त्याचं.

You cannot copy content of this page