एका वेगळ्याच घरात मी लग्न करून आले



हॅलो मित्रानो. माझे नाव भारती आहे. काही दिवसाआधीच माझे लग्न झाले. आई वडिलांनी लग्न जुळवून दिले. माझा नवरा दिसायला सुंदर आहे. सभ्य स्वभावाचा, जास्त बोलत नाही पण चांगल्या नोकरीला आहे.

मला लग्न करताना भीती फक्त एकाच गोष्टी ची होती कि मोठे परिवार आहे. सर्व एकत्र राहतात. गावाच्या थोडे बाहेरच्या बाजूला रस्त्याच्या जवळ मोठा बांगला आहे. ३ मजल्याच्या बंगल्यात १० ते १५ खोल्या आहेत. घरात सासू सासरे, त्यांची एकूण चार मुले. ३ मुलं आणि एक मुलगी. त्यात माझा नवरा तिसरा नंबर चा आहे. मोठ्या मुलाचे लग्न झाले, तो पण इथेच राहतो त्याच्या बायको बरोबर. मुलीचे लग्न होऊन डिवोर्स झाला त्यामुळे ती पण इथेच राहते. लहान मुलाचे अजून लग्न झाले नाही.

त्याबरोबर त्यांचे काका काकी पण इथेच राहतात. त्याना एका ५ वर्षाचा मुलगा आहे. हे सोडून एक जेवण बनवायला आचारी ठेवला आहे तो ४० वर्षाचा आहे. तो पण इथेच राहतो. आणि एक मोलकरीण आहे ती इथेच घरकामाला आहे आणि ४० ते ४५ वर्षाची आहे. घरातील सर्व कामे करते.

घरात आता सासू सासरे, काका काकी आणि तिचा ५ वारसाचा मुलगा, मोठा भाऊ आणि त्याची बायको, डिवोर्स झालेली बहीण, मी आणि माझा नवरा, लहान भाऊ आणि जेवण बनवणारा आचारी, आणि काम करणारी मोलकरीण असे सर्व मिळून १३ लोक एका बंगल्यात राहतात.

You cannot copy content of this page