पहीला धडा

सरकारी कर्मचारी म्हणजे पैसाच पैसा. हे मी ओळखून होतो आणि म्हणूनच मी कॉलेज करत करत परीक्षा देऊन एका खात्यात मोठ्या अधिकारी हुद्द्यावर कामाला लागला होतो. माझा हुद्दा मोठा असल्याने माझ्या हातात खूप अधिकार होते.

मी रुजू झालो न झालो तोच माझी बदली एका खडे गावात झाली देखील. मी नाराज झालो. कारण मला शहरात राहायची सवय झाली होती आणि त्यामुळे मला असा प्रश्न पडला होता कि मी खेडेगावात अड्जस्ट होईन कि नाही याचा. त्यामुळे मनातून मला त्या गावी जाण्यात फार काही रस नव्हता.

पण नाईलाज असल्याने मी एकादशी तिथे रुजू झालोच. मी काम चालू केले तेव्हा खूप कर्मचारी गैरहजर होतो. माझ्या केबिन मध्ये बसून मी सगळ्यांचा आढावा घेत होतो. मी रुजू होऊन साधारण पंधरा दिवस झाले होते. बाकी सगळे कर्मचारी कामावर रुजू होत होते पण एक मात्र अजूनही आली नव्हती. मला समजेना कि काय नेमके कारण आहे ते.

शेवटी साधारण महिनाभर झाल्यावर त्या दिवशी मला त्या कर्मचाऱ्याचे दर्शन झाले. सुरेखा नाव होते तिचे. मी सुरवातीस त्या गैरहजर कर्मचाऱ्यावर जाळ काढायचे ठरवले होते. पण जेव्हा मी सुरेखाला बघितले तेव्हा मात्र मी गर्भगळीत च झालो.

Leave a Comment

You cannot copy content of this page