थंडीची मजा

मी एका मोठ्या कंपनी मध्ये जॉब करत होतो. माझा हुद्दा तास बऱ्यापैकी मोठा होता. माझ्याबरोबर खूप लोक काम करत होते. आमच्या विभागात मुली देखील भरपूर होत्या. मोठ्या कंपनीची एक चांगली गोष्ट चांगली असते ती म्हणजे ते त्यांच्या कर्मचारांना खूप सवलती, ट्रिप इत्यादी देत असतात. त्याच प्रकारे आम्हाला कंपनी ने एका थंड हवेच्या ठिकाणी जाण्याची ट्रिप दिली होती.

आमच्या विभागाचे सर्वजण जाणार होतो. माझ्याबरोबर माझे इतर सहकारी पण खूप खुश होते. त्याचपैकी एक होती वैष्णवी.

वैष्णवी माझ्या पेक्षा छोटी होती. माझे लग्न झाले होते. तीचे अजून लग्न व्हायचे होते. तिचे कॉलेज नुकतेच पूर्ण झाले होते आणि एक वर्षांपूर्वीच तिने कंपनी मध्ये जॉब घेतला होता. तिच्या ऑफिस च्या पहिल्या दिवसापासून मी तिला मदत करत होतो. तिला सगळे समजावून सांगितले होते काम कसे करायचे ते. वर्षभर होऊन गेले तरी अजून तिच्या चुका काही कमी झाल्या नव्हत्या. मी तिला नेहमी सांभाळून घेत असे.

तिला हि गोष्ट चांगली माहित होती. त्यामुळे ती माझे नेहमीच गुणगान करत असे. ती मला नेहमी म्हणायची “पंकज, तुझा स्वभाव खूप चांगला आहे. तू मला किती सांभाळून घेतो. मी इतक्या चुका करते तरीही तू मला कधी ओरडत नाही. यामुळेच तू माझा ऑफिस मधील सगळ्यात लाडका आहेस. आणि कॉलेज नंतर इतक्या चांगल्या पद्धतिने मी कोणास माझ्या गोष्टी सांगितल्या नाहीत. मी तुझ्याशी माझ्या गोष्टी नेहमीच शेयर करते.”

Leave a Comment

You cannot copy content of this page