माझ्या आई वडिलांना मिळाले त्यांच्या स्वार्थीपणाच फळ

माझ नाव सुषमा आहे. मी एका गावामध्ये राहते. माझ्या आईच नाव हेमा आहे. आमच्या बंगल्यापासून 4 घर सोडून पुढे दिनकर काकांचा बंगला आहे. मी त्यांना दिनू काका म्हणून हाक मारायचे. दिनू काकांना 2 मुली आहेत. दिनू काकांच्या दोन्ही मुली ऑस्ट्रेलिया मध्ये राहतात. दिनू काकांच्या बायकोला हर्ट अॅटक येऊन त्या मरण पावल्या होत्या. माझ्या कुटुंबाचे आणि दिनू काकांच्या कुटुंबाचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध होते त्यामुळे आमच एकमेकांच्या घरी येण-जाण नेहमीच सुरु असायचं. जणू आमच्या आणि दिनू काकांच्या कुटुंबियांमध्ये घरोबाच होता. दिनू काका एकटेच राहत असल्याने दिनू काकांची काळजी घ्यायला किंवा त्यांची सेवा करायला कोणीच नव्हते त्यामुळे माझे आई वडील हे दिनू काकांना जेवणाचा डबा देत होते. कधी कधी माझे वडील दिनू काकांना जेवणाचा डबा घेऊन जायचे तर कधी कधी मी दिनू काकांना जेवणाचा डबा घेऊन जायचे. मी किंवा माझे वडील दररोज सकाळी आणि रात्री दिनू काकांना जेवणाचा डबा द्यायला त्यांच्या घरी जायचे. माझ्या वडिलांना दिनू काका त्यांचे भाऊ मानत होते.

दिनू काकांच्या आसपासचे शेजारी दिनू काकांशी जास्त बोलायचे नाहीत कारण की, दिनू काका एकटे असल्याने त्यांना जेवणाचा डबा द्यायला लागले किंवा दिनू काकांच्या आजारपणात त्यांची सेवा करावी लागेल. अश्याच काही कारणांमुळे दिनू काकांच्या आसपासचे शेजारी त्यांच्या घरीही येत-जात नव्हते. त्यामुळे दिनू काका पूर्णपणे माझ्या आई-वडिलांवर अवलंबून होते. जेव्हा 4 वर्षापर्यंत माझ्या आई वडिलांनी दिनू काकांची दिवस-रात्र काळजी घेतली तेव्हा दिनू काकांनी खुश होऊन त्यांचा 22 लाखांचा बंगला आणि त्यांची 7 एकर शेती माझ्या वडिलांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतला.

“वसंतराव.. एक दिवस जाऊया तहसीलदार कार्यालयात. मला माझा बंगला आणि सगळी शेती तुझ्या नावावर करायची आहे… माझ्या मुलींकडे ऑस्ट्रेलियात बंगला, गाडी, पैसा, प्रॉपरटी खूप आहे त्यामुळे त्या दोघींना माझ्या प्रॉपरटी मध्ये काडीमात्र रस नाही. तुम्हाला आताही ही मुलगा होऊ शकतो त्यामुळे तुझ्या होणाऱ्या मुलासाठी ही माझी प्रॉपरटी ठेव. मी कधी मरून जाईन, मलाच माहित नाही.” अस बरच काही दिनू काका माझ्या वडिलांना म्हणाले. माझे वडील रात्री घरी आले तेव्हा माझ्या वडिलांनी माझ्या आईला ही गोष्ट सांगितली तेव्हा तर माझ्या आईला आनंदाच्या भरात काय करू आणि काय नको? अस झाल होत. माझ्या आई वडिलांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या आणि त्याच आनंदाच्या भरात माझे आई वडील आपापसात चर्चा करू लागले की, “जर का आपण तो 22 लाखांचा बंगला कोणत्याही साहेब लोकांना भाड्याने दिला तर दर महिन्याला कमीतकमी 10 हजार तरी नक्कीच येतील किंवा तो बंगला विकून टाकला तर किंवा त्या बंगल्याचे रुपांतर लॉजमध्ये केले तर किंवा त्या बंगल्याचे रुपांतर हॉटेलमध्ये केले तर? दिनू काकांची शेती वाट्याने करायला दिली तर? दिनू काकांची शेती खंडाने करायला दिली तर? दिनू काकांची शेती विकून टाकली तर?” अश्या बऱ्याच गोष्टींवर माझे आई वडील चर्चा करत बसले होते. माझे आई वडील खुपच खुश झाले होते. माझ्या आई वडिलांना असे वाटत होते की, जणू त्यांच्या पदरात आयत घबाडच पडणार आहे.

ज्या दिवशी दिनू काका माझ्या वडिलांना घेऊन तहसीलदार कार्यालयात जाणार होते त्या दिवशी माझ्या वडिलांनी आमच दुकान बंद ठेवल आणि माझे वडील दिनू काकांकडे गेले पण त्याच दिवशी दिनू काका आजारी पडले होते त्यामुळे त्या दिवशी माझे वडील दिनू काकांना तहसीलदार कार्यालयात घेऊन जाऊ शकले नाहीत आणि दिनू काकांची प्रॉपरटी पण स्वताच्या नावावर करू शकले नाहीत. माझी आई खूपच स्वार्थी आणि लोभी स्वभावाची होती. माझी आई रात्र आणि दिवस माझ्या वडिलांचे कान भरायची की, “काहीही करून दिनू भाऊजींची प्रॉपरटी स्वताच्या नावावर करून घ्या.” माझे आई वडील प्लानिंग करत होते की, आपल्याला कोणत्या पद्धतीने दिनू काकांची प्रॉपरटी मिळवता येईल? माझ्या आई वडिलांनी एक प्लान बनविला होता पण अचानकरीत्या दिनू काकांना त्वचेचा आजार झाला आणि दिनू काका खुपच आजरी पडले त्यामुळे माझ्या आई वडिलांचा सगळाच प्लान फिस्कटला. दिनू काका एकटेच राहत असल्याने त्यांची काळजी घेण्यासाठी किंवा त्यांची सेवा करण्यासाठी दिनू काकां जवळ कोणतरी थांबण गरजेच होत. तेव्हा माझे वडील माझ्या आईला म्हणाले की, “तु आणि सुषमा, दररोज दिनू काकांच्या घरी जाऊन त्यांची काळजी घ्या, त्यांची सेवा करा.” मी माझ्या वडिलांना म्हणाले, “पप्पा.. मी काही जाणार नाही, माझ कॉलेज आहे.” माझी आई लगेचच माझ्यावर भडकली आणि मला म्हणाली, “अग.. सुषमे… तुला काही अक्कल आहे की नाही, काय होतंय एक महिना कॉलेजला गेली नाहीस म्हणून…. आली मोठी दीड शहाणी…. जस काय खूप शिकून…. नोकरीच करणार आहेस… आणि धनच लावणार आहेस…. ते काही नाही, तुझे पप्पा बोलतील तुझ्या कॉलेजच्या प्रिन्सिपल शी… काय हो???” माझे पप्पा लगेचच माझ्या आईला म्हणाले, “हो.. हो.. बोलून घेतो, मी हिच्या कॉलेजच्या प्रिन्सिपल शी…” मग पप्पा मला म्हणाले, “सुषमा, ही एक संधी आहे. दिनू काकांचं मन जिंकण्याची हीच वेळ आहे. एकदा का दिनू काका आपल्यावर अजून खुश झाले तर लवकरात लवकर आपल्या नावावर त्यांची प्रॉपरटी करतील.” मग मी पण रागाने माझ्या पप्पांना म्हणाले, “हो.. जाते…. आईबरोबर दिनू काकांच्या घरी…”

You cannot copy content of this page