गोड आठवणी, कडू जगणे भाग – 1

ही घटना 5 वर्षापूर्वीची आहे. मी तेव्हा कॉलेजमध्ये होते. माझे वय आज 28 वर्ष आहे. तेव्हा माझी एम.कॉम च्या शेवटच्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती आणि मी माझा अभ्यासक्रम पूर्ण केलेला होता. रिव्हिजनच्या नावाखाली पुन्हा पुन्हा तोच अभ्यास करून, त्या अभ्यासाची उजळणी करण्याचा मला खूपच कंटाळा आलेला होता पण पर्याय नव्हता.

माझे पप्पा एका सरकारी ऑफिसमध्ये जल संवर्धन विभागामध्ये काम करतात. प्रत्येक वर्षी पप्पांच्या ऑफिसमधील लोक पिकनिकसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. त्या वेळी सुद्धा दर वर्षीप्रमाणेच पप्पांच्या ऑफिसमधील लोकांचे पिकनिकला जाण्याचे नियोजन चालले होते. पप्पांच्या ऑफिसमधील लोक वर्षातून एकदा मौज मजा करायला बाहेर पडायचे पण फक्त आपल्या बायकोला घेऊन, मुलांना नाही म्हणजे त्या लोकांना त्यांच्या बायकोबरोबर बिन्दास्तपणे आणि मोकळेपणाने मौज-मस्ती, ऐश करता येईल.

त्या वर्षी त्या लोकांनी नाशिक जवळील देवळाली हे ठिकाण निवडले होते. राहण्यासाठी कोणते तरी गेस्ट हाऊस पण बुक करून ठेवले होते.

पप्पांचे पिकनिकला जाण्याचे दिवस जवळ येत असताना, मी सुद्धा पिकनिकला येते असा विषय काढला.

You cannot copy content of this page