आम्ही तिघे

मी ज्या कंपनी मध्ये काम करत होतो त्यांच्या विविध शहरात शाखा विस्तारल्या होत्या. मी त्या कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो. माझ्याकडे मार्केटिंग ची जबादारी होती. मार्केटिंग साठी मला सतत बाहेर गावी जावे लागत असे. विविध कंपन्यांना भेटी देणे आणि धंदा गोळा करणे हे माझे मुख्य काम. काही वेळा मला एकेच ठिकाणी महिनाभर पेक्षा देखील जास्त रुजावे लागत असे.

असेच मला नेहमी जास्त दिवस राहायचे नेहमीच लागणारे ठिकाण म्हणजे पुणे. त्या वेळी देखील मला दोन महिन्यांसाठी पुण्याला राहावे लागणार होते. मी सतत लॉज ला राहून कंटाळलो होतो. त्यामुळे यावेळी मी पेइंग गेस्ट म्हणून राहायचे ठरवले. मी इंटरनेट वरून एक जाहिरात बघितली आणि त्यांना भेटायला गेलो.

एका मोठ्या बंगल्या मधे मी पोहोचलो होतो. दारा वरची बेल वाजवून मी उभा होतो. थोड्याच वेळात दार उघडले गेले. साधारण पस्तिशीची एक अतिशय देखणी बाई माझ्या समोर उभी होती. गुलाबी रंगाची साडी, डार्क लिपस्टिक, बेंबी खाली साडी आणि मोकळे सोडलेले केस. तिचे गोरेपान ते रुपडे बघून मला बरे वाटले. मला बसायला सांगून ती आत निघून गेली. थोड्या वेळात एक माणूस बाहेर आला. साधारण पंचेचाळीस वयाचा असावा तो.

“नमस्कार माझे नाव नितेश तनवाणी. तो म्हणाला. मघाशी दार उघडले ती माझी बायको हेतल” त्याने त्याची ओळख करून दिली.

Leave a Comment

You cannot copy content of this page