भोला सेठ चा घरगडी

मी शिक्षणात फारसा हुशार नव्हतो.शाळेत असताना मी कधीच एका झटक्यात पास झालो नव्हतो. त्यामुळे मला शाळेत फारसा रस नव्हता. पण मला खेळा मध्ये खूपच जास्त रस होता. त्यामुळे शाळेतील विविध स्पर्धामंध्ये मी भाग घेत असे. खेळामुळे माझी शरीरयष्टी मजबूत झाली होती. मी दहावी नंतर शिक्षण बंद केले आणि छोटी मोठी कामे करू लागलो. शिक्षण नसल्याने मला फार चांगले काम मिळत नव्हते.

मला एके दिवशी मला माझा एका मित्र म्हणाला “अरे राजू, गावातील भोला सेठ कडे घरगडी म्हणून एक जागा आली आहे. जर तुला त्यात रस असेल तर बघ. मी बोलतो त्यांच्याशी.” मी लागलीच होकार दिला होकार दिला.

ठरल्या दिवशी मी सेठ कडे गेलो. त्याने मला माझी माहिती विचारली आणि मला लागलीच कामाला रुजू होण्यास सांगितले. सुरवातीस मी त्याच्या दुकानात कामास सुरवात केली. दिवस जात होते आणि सेठ माझ्या कामावर खुश होता. मी आता त्याच्या विश्वासातील माणूस झालो होतो. हळू हळू त्याने महत्वाची कामे मला देण्यास सुरवात केली.

त्यातूनच मी आता सेठ च्या घरी येऊ जाऊ लागलो. मुळातच मी घरगडी म्हणून लागलो होतो. पण सेठ पक्का बेरकी होता आधी माझी परीक्षा त्याने घेतली होती आणि मगच मला घरी जाण्यास सांगितले.

Leave a Comment

You cannot copy content of this page