चेटकिणीबरोबर रात्र

हेल्लो मित्रांनो मी अर्जुन आहे मी तुम्हाला एक खरी घटना सांगणार आहे. मित्रांनो ही घटना दोन वर्षापूर्वीची आहे जेव्हा मी राजस्थान मध्ये राहत होतो आणि त्यावेळी जयपूर मध्ये एका कोलेज मध्ये शिकत होतो. माझे वय १९ होते आणि त्याच्या शेजारी एक गाव आहे. माझे एक चांगल्या कोलेज मध्ये अडमिशन झाले होते आणि मी थोडा हुशार पण होतो. मला कोलेज पासून घरी येण्यात खूप त्रास होत होता. गावामध्ये शेजारीच आमचे दूरचे नाते वाईक राहत होते.

मी त्यांच्या इथे राहायचा विचार केला आणि मी तिकडे पूर्ण तीन वर्षे राहणार होतो. त्यांच्या घरात ६ लोक होते. पती पत्नी, त्यांची तीन मुले आणि त्यांची आजी. मी त्या लोकांबरोबर खूप थोड्या वेळात मिसळलो होतो आणि त्यांना पण चांगले वाटत होते. पण घरात लोकांच्या मध्ये राहून माझा अभ्यास होत नव्हता आणि तेथून जवळच त्यांची एक जागा होती आणि मला तिथे अभ्यास करायला काही अडचण नव्हती आणि मला तिथे जेवणाची पण काही समस्या नव्हती.

मी तिकडे आरामात राहू लागलो, पण मला रात्री काही आवाज ऐकू येत होते कि जणू एखादी मुलगी रडत असेल पण मी त्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो आणि मला काही दिवस तसे आवाज ऐकू आले. मग मी तिथे आजू बाजूच्या लोकांना विचारले तर ते म्हनाले कि असे काही नाही आणि तू त्यावर जास्त लक्ष देऊ नको.

मग काही दिवसंनी मला माझ्या रुमच्या खिडकी जवळ काही आवाज आला. मी पटकन दरवाजा उघडून पहिले तर तिकडे कोणीच नव्हते आणि मी दरवाजा बंद करून वाचू लागलो. त्या रात्री गावात लाईट नव्हती आणि काही वेळाने परत मला आवाज आला आणि मी दरवाजा उघडून पहिले तर एक मुलगी बाहेर उभी होती आणि ती मला म्हणाली कि थोडे पाणी प्यायला मिळेल का?

Leave a Comment

You cannot copy content of this page