धोब्याने केला भाभीचा गेम

माझे नाव उदय. माझा व्यवसाय धोब्याचा होता. माझे स्वतःचे इस्त्रीचे दुकान होते. माझा व्यवसाय तसा खूप वर्षे काही जुना नव्हता. माझे बोलणे लाघवी आणि गोड होते. त्यामुळे गावातील बाकी इस्त्रीच्या दुकानांना जेवढे गिर्हाईक नव्हते तेवढे मला एकट्याला होते. त्यामुळे मनोमन मला आनंद होता.

माझ्याकडे हल्ली गिऱ्हाईकांची प्रमाण खूपच जास्त वाढले होते. मला एकट्याला हा डोलारा सांभाळणे अवघड होऊ लागले होते. म्हणून मी एक मुलगा कामासाठी ठेवून घेतला. नदीवर जाऊन कपडे धुणे त्याचे काम होते. इस्त्री करणे व गिर्हाईकांना देणे माझे काम ठेवले. गिर्हाईकाला कामगारांशी जोडून द्यायचे नाही असा अघोषित नियम आमच्या व्यवसायात होता. ते बरोबर हि होते म्हणा.

सगळेच गिऱ्हाईक काही दुकानात येत नसत. काही गिऱ्हाईक असे होते की त्यांच्या घरी जाऊन त्यांचे कपडे आणावे लागत असत आणि घरपोच द्यावे देखील लागत असे. माझ्याकडे देखील असे खपू गिऱ्हाईक होते. त्यातीलच एक होता भोला सेठ.

भोला सेठ नावाचा भोला असला तरी प्रत्यक्षात तो खूपच चतुर होता. चेंगट सेठ सारखे तो पैसे मोजून खर्च करायचा आणि तरीही त्याचे पोट बेंबीच्या खूप पुढे आले होते. त्याला चालतानाही दम लागत असे. त्याच्या घरी मी नेहमी कपडे आणण्यास जात असे. नाही म्हणायला आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी मला त्यांच्याकडे जावे लागे.

Leave a Comment

You cannot copy content of this page